नाशिक -मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात नाशिकच्या दिशेने येणारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीतील मायलेकींसह 3 जण ठार झाले आहेत. नीना सागर शहा (वय 44) ,संजना सागर शहा(वय 19) आणि विद्या बाळू थोरात, अशी मृतांची नावे आहेत. तर, सागर शहा व त्यांचा मुलगा सावन शहा हे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण पुणे येथील रहिवासी होते.
नाशिकच्या आडगाव शिवारात कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, दोन जखमी - Nashik Accident
पुण्यातील येरंडवणे भागातील हिमालय सोसायटीत राहणारे शहा कुटुंबीय सोमवारी मालेगावहून गाडी क्रमांक एमएच 14 एक्स 6301 या वाहनाने नाशिकच्या दिशेने जात होते. रात्री एक वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात स्पीड लॉक होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.
अपघातग्रस्त वाहन
हेही वाचा -चिमूर - पिंपळनेरी मार्गावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू
पुण्यातील येरंडवणे भागातील हिमालय सोसायटीत राहणारे शहा कुटुंबीय सोमवारी मालेगावहून गाडी क्रमांक एमएच 14 एक्स 6301 या वाहनाने नाशिकच्या दिशेने जात होते. रात्री एक वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात स्पीड लॉक होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. गाडी उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यात चारचाकी वाहन चक्काचूर झाले आहे.