नाशिक -येवल्यात आज सायंकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 3 जण ठार झाले असून 3 जण जखमी झाले आहेत. येवला-मनमाड महामार्गवरील कासारखेडे फाट्याजवळ कार व दुचाकी यांच्या समोरासमोर झालेल्या अपघात 2 जण ठार तर 1 जण व जखमी झाला आहे.
येवल्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 3 जण ठार तर 3 जण जखमी - येवल्यात दुचाकी चारचाकीची धडक
येवल्यात आज सायंकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 3 जण ठार झाले असून 3 जण जखमी झाले आहेत. तालुक्यात आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोन अपघाताच्या वेगवेगळ्या घटना घडल्या असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुचाकीवर एकाच कुटुंबातील तीन जण प्रवास करीत होते. अंकाई किल्ल्याजवळ कासारखेडे फाट्यावजवळ त्याची दुचाकीची व कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर, एकाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत झाला. दुसरी एक व्यक्ती 1 जण गंभीर जखमी आहे. दुचाकी मनमाडहून येवल्याच्या दिशेने येत होती. तर, कार येवल्याकडून मनमाडकडे जात होती. अपघातातील मृत व्यक्ती प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.
तालुक्यातील येवला-भारम रोडवर सायगाव फाटा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. तालुक्यात आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोन अपघाताच्या वेगवेगळ्या घटना घडल्या असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.