नाशिक- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात नाशिक जिल्ह्यात 326 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण 235 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 8165 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 5394 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 365 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 3958 रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 66.6 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31 हजार 897 जणांची चाचणी करण्यात आली असून 22 हजार 822 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याचे प्रमाण 71.55 टक्के इतके आहे.