नाशिक -जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी 395 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 233 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहेत. 10 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 359 झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात 395 नवे कोरोनाबाधित रुग्ण;10 रुग्णांचा मृत्यू - नाशिक कोरोना केसेस
नाशिक जिल्ह्यात बुधवारी 395 नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 7839 जणांना कोरोनाची लागण झाली असून यात 359 जणांचा बळी गेला आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 7839 जणांना कोरोनाची लागण झाली असून यात 359 जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 5201 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66 टक्के इतके आहे.
बुधवारी वाढलेले रुग्ण..
नाशिक ग्रामीण 144
नाशिक मनपा 233
मालेगाव मनपा 16
जिल्हा बाह्य 02
मृतांची संख्या
नाशिक ग्रामीण 75
नाशिक मनपा 188
मालेगाव मनपा 79
जिल्हा बाह्य 14
एकूण नाशिक जिल्ह्यात 359
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती
एकूण कोरोनाबाधित रुग्ण 7839
कोरोनामुक्त - 5201
एकूण मृत्यू - 359
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण - 3828
नाशिक ग्रामीण भागात उपचार घेत असलेले रुग्ण
नाशिकमध्ये 118, चांदवड 10, सिन्नर 74, दिंडोरी 58, निफाड 88 नांदगांव 43,येवला 43, त्र्यंबकेश्वर 22, बागलाण 14, इगतपुरी 55, मालेगाव ग्रामीण 41, देवळा 11, कळवण 11