महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू - collapsed

जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील हौसाबाई फकीरा कुंवर (वय ७२) संपत शंकर उदार (वय ६५ रा. दिंडोरी) पिटु बापु शिंदे (वय ३० रा.जायखेडा) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 17, 2019, 2:34 AM IST

नाशिक - जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ३ दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला असून आज अवकाळी पावसामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील हौसाबाई फकीरा कुंवर (वय ७२) संपत शंकर उदार (वय ६५ रा. दिंडोरी) पिटु बापु शिंदे (वय ३० रा.जायखेडा) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

देवळा तालुक्यातील वाजगाव येथे दुपारी पावसाच्या सरी कोसळत असताना बकरी बांधायला गेलेल्या हौसाबाईंवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान यावेळी हौसाबाईंसह एक बकरी देखील मरण पावली आहे.
दरम्यान दिंडोरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. आज दुपारी खेडगाव जोपुळ आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले होते. याचवेळी अक्राळे येथील टेकडीवर असणाऱ्या मंदिरावर वीज पडली. यावेळी मंदिरातील पुजाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. संपत शंकर उदार(वय ६५) असे या मृत पुजाऱ्याचे नाव आहे.

जायखेडा येथील पाडगण शिवारात आज सायंकाळी वीज कोसळून मेंढपाळ जागीच ठार झाला. या तरुणाचे नाव पिंटू बापू शिंदे (वय ३०) असे आहे. हा तरुण साक्री तालुक्यात आयने येथील रहिवासी असल्याचे समजते. दुष्काळामुळे गावाकडे मेंढ्यांसाठी चारा पाणी उपलब्ध नसल्यामुळे ते जायखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मेंढ्या चारीत होता. आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पिंटूने जवळच असलेल्या लिंबाच्या झाडावर आसरा घेतला. यावेळी अचानक वीज कोसळली यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details