नाशिक -समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी, यासाठी प्रतिष्ठित 'नाशिक रन'मध्ये नाशिककर धावले. शहरातील विविध कंपन्यांतर्फे एकत्रित येत सामाजिक बांधिलकीतून समाजाप्रती जबाबदारी पार पाडण्यासाठी जानेवारी २००३ पासून 'नाशिक रन'चे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे संकलित होणाऱ्या निधीच्या माध्यमातून शैक्षणिक गरजा, पिण्याचे पाणी, संगणक शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच नाशिककरांच्या आरोग्याबद्दल विविध उपक्रम राबवले जातात.
समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी, हजारो नाशिककर धावले हेही वाचा -#HBDRahulDravid : पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू!
शनिवारी सकाळी महात्मानगर येथील मैदानापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यंदा प्रथमच दहा किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. १५ ते ३५, ३६ ते ५० आणि ५१ वर्षांपुढील गटासाठी ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्याला सात हजार, द्वितीय क्रमांकाला पाच हजार आणि तृतीय क्रमांकाला तीन हजार अशा रोख रूपयांचे बक्षिस देण्यात आले. 'नाशिक रन'कडे देणगी स्वरूपात प्राप्त होणारा निधी कुठल्याही कार्यालयीन कामासाठी खर्च केला जात नाही. गेल्या वर्षी जमा झालेल्या ८७ लाख रूपयांमधील बराचसा निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यात आला होता.
या स्पर्धेचे उद्धाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते झाले. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महाजन बंधू, अनिरुद्ध आत्मी, नारायण वाघ, अश्विनी देवरे, मनीषा रोंदळ, हे ह्या मॅरेथॉनचे ब्रँड अँबेसिडर आहेत.