महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक प्रवाशांची लूट करणारे अटकेत..

मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना लूटमार करण्याचे प्रकार वाढले होते. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड रेल्वेस्थानका जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सापळा रचला. यात दोघांना अटक केली असून चौकशीत आतापर्यंत दोन गुन्ह्याची कबुली या संशयितांनी दिली आहे.

नाशिक प्रवाशांची लूट करणारे अटकेत..

By

Published : Jun 4, 2019, 12:16 PM IST


नाशिक - मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयित अविनाश पाटील अभिजीत दासवरले या दोन गुन्हेगारांकडून पोलिसांनी सहा मोबाईलसहित पंधरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना लूटमार करण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत अनेक तक्रारी मनमाड पोलीस स्टेशन तसेच रेल्वे पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षकांनी सूचना दिल्या, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड रेल्वेस्थानका जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशी केली असता पंधरा दिवसांपूर्वी स्टेशन जवळील ओव्हरफ्रिज परिसरात एका प्रवाशाला एकटे गाठून त्याच्या कडील मोबाईल आणि रोकड जबरीने लुटल्याची कबुली या दोघांनी दिली. हे दोघे संशयित प्रवाशांना रात्रीच्या वेळी एकटे पाहून चाकूचा धाक दाखवून लुटत होते. चौकशीत आतापर्यंत दोन गुन्ह्याची कबुली या संशयितांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कर्पे, स्वप्नील नाईक, राजाभाऊ मुंडे, हेमंत गिलबिले, हरीश आव्हाड, गणेश नरोटे, प्रकाश तुपलोंढे, गिरिष बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.


मनमाड आणि नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे


मनमाड रेल्वे स्थानक गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले असून येथील गुन्हेगारीचे नाशिक-मुंबई पर्यंत असलेल्या गुन्हेगारांशी लागेबांधे आहेत. त्यातून लुटमारीचे प्रकार घडत असतात. मनमाड रेल्वे स्टेशनवर चोरी करून नाशिक-मुंबई अथवा भुसावळच्या दिशेने पसार होण्याची मनसुबे गुन्हेगार असतात. मनमाड रेल्वे स्थानक परिसरात सोबतच नाशिकरोड रेल्वे स्थानक गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details