नाशिक स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे Late Dharmaveer Anand Dighe यांचे नाशिकचे खंदे कार्यकर्ते भास्कर शिरसाठ यांच्यासाठी दिघे आजही Anand Dighe Supporters Bhaskar Shirsath of Nashik दैवत आहे. त्यामुळे आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांचा सहवास आपल्यासोबत कायम राहावा म्हणून ते राहत असलेल्या घरातील एक खोलीचे आजही जतन करण्यात आले Anand Dighe is Popular Leader आहे. ही खोली फक्त आनंद दिघे यांच्या जयंती Anand Dighes Birth anniversary आणि पुण्यतिथीलाच उघडण्यात येत असल्याचे शिरसाठ यांनी ई-टीव्हीशी बोलताना सांगितले.
आमच्याकडे नाशिकला नेहमी यायचे शिवसेना नेते आनंद दिघे हे सर्वप्रिय नेते होते. फक्त ठाणे, मुंबई नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती. याच कार्यकर्त्यांमधील नाशिकरोड भागातील भास्कर शिरसाठ यांचे नाव घेता येईल. आनंद दिघे एका प्रकरणात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात तीन महिने कैदेत होते. याच काळात भास्कर शिरसाठ यांनी दिघे यांच्या जेवणाची व्यवस्था बघितली होती. नंतर दिघे आणि शिरसाठ यांच्यात बंधुत्व निर्माण झाले. मग जेव्हाही दिघे हे नाशिकला येत तेव्हा त्यांचा मुक्काम हा शिरसाठ यांच्या घरात असायचा.
नाशिकच्या कार्यकर्त्याची श्रद्धा आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीकरिता स्वतंत्र खोली जपली याचदरम्यान शिरसाठ यांनी बंगल्याचे काम सुरू केले. यात आनंद दिघे यांच्यासाठी एक खोली बांधण्यात आली होती. जेव्हाही दिघे हे नाशिकला येत असत तेव्हा ते याच खोलीमध्ये राहत होते. भास्कर शिरसाठ यांनी आनंद दिघे फाउंडेशन उघडत अनेक सार्वजनिक कार्यक्रम राबवले. यातील अनेक कार्यक्रमांना आनंद दिघे आवर्जून येत असत. या काळात शिरसाठ यांनी ते राहत असलेल्या परिसराला आनंदनगर नाव दिले होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिरसाठ कुटुंबाला मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी दिघींच्या स्मृती जपत आनंद दिघे ज्या खोलीमध्ये राहत होते, ती खोलीत फक्त दिघेंच्या आठवणी जपल्या आहेत. खोलीत आनंद दिघे विश्राम करीत असलेला बेड, दिघे यांचे जुने फोटो ते जपत आलेल्या रुद्राक्षाची माळ या वस्तू आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
त्यांनी मला भाऊ मानले होतेदिघे साहेबांचे आमचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांनी मला भाऊ मानले होते. त्यामुळे आमच्या प्रत्येक सुख-दुःखात त्यांच्या सहभाग असायचा. नाशिकला आल्यावर ते आमच्या घरी उतरायचे. त्यांच्यासाठी आम्ही बंगल्यात एक खोली स्वतंत्र बांधली होती. ती नाशिकला आल्यावर याच ठिकाणी मुक्काम करायचे. आमच्या पुतण्याचे आनंद असे नामकरण त्यांनीच केले होते. तसेच आम्ही आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले. यात दिघे साहेब कायम सहभागी होत असत. ते आमच्यात नसले तरी त्यांचा वावर या घरात आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही ही खोली त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तशीच ठेवली आहे. दिघे साहेब आमच्यासाठी दैवत होते आणि कायम राहतील, असे भास्कर शिरसाठ यांनी सांगितले.
हेही वाचा Dhananjay Munde Baramati Visit एकनाथरावपासून ई आणि देवेंद्रपासून डी म्हणजे हे ईडी सरकार , धनंजय मुंडे यांचा भाजप सरकारवर निशाणा