महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू; नाशिकमधील घटना - nashik news

चोरी करत असताना विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली. शहरातील अडगाव नाका परिसरात हा चोर चोरी करण्यासाठी आला होता. चोरी करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू

By

Published : Aug 13, 2019, 6:25 PM IST

नाशिक -चोरी करत असताना विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. शहरातील अडगाव नाका परिसरात हा चोर चोरी करण्यासाठी आला होता. चोरी करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू

नाशिकच्या आडगाव नाका परिसरात केळकर वाडीतील एका इमारतीजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा व्यक्ती मृत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह विजेच्या डीपीच्या खालच्या बाजूला पडलेला होता. बाजूलाच असलेल्या अल्युमिनियमच्या पट्ट्या पसरलेल्या अवस्थेत होत्या. रात्रीच्या वेळी याच पट्ट्या चोरी करण्यासाठी हा चोर आला होता. मात्र, पट्ट्या मोठ्या असल्याने विजेच्या तारेला लागल्या आणि विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयास्पद मृत्यू असल्याचा अंदाज पंचवटी पोलिसांनी व्यक्त करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

शवविच्छेदन अहवालातही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे समोर आले. हा चोर चोरी करण्याच्या उद्देशानेच आल्याचे समोर आले आहे. चोर खरच चोरीच्या उद्देशाने आला होता का ? खरोखर चोरीच करत असताना त्याचा मृत्यू झाला का? की इतर कारणांनी मृत्यू झाला हे पोलीस तपासात समोर येईलच. मृत चोराची अद्याप ओळख पटलेली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details