महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक; सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी फोडले एटीएम मशीन - नाशिक एटीएम चोरी न्यूज

नाशिकमध्ये गेल्या दीड महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. खून, हाणामाऱ्या, चोऱ्या अशा घटना वाढल्याने नागरिक आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे.

सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी फोडले एटीएम मशीन
सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी फोडले एटीएम मशीन

By

Published : Feb 19, 2021, 3:34 PM IST

Updated : Feb 19, 2021, 5:54 PM IST

नाशिक- शहरातील भुजबळ फार्म येथे महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे एटीएमजवळ सुरक्षारक्षक असतानाही ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अज्ञात चोरांनी किती रक्कम चोरली याचा तपास पोलीस घेत आहेत.

सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी फोडले एटीएम मशीन
पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हनाशिकमध्ये गेल्या दीड महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. खून, हाणामाऱ्या, चोऱ्या अशा घटना वाढल्याने नागरिक आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे. अशीच घटना गुरुवारी मध्यरात्री घडली सिक्युरिटी गार्ड असतानाही सुटबुटात आलेल्या चोरट्याने नवीन नाशिक परिसरातील महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेच्या एटीएमला लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, रक्कम निघत नसल्याने चोरट्यांनी मशीनची तोडफोड केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी cctv कॅमेरे तोडून टाकल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे आहे.

सुरक्षा रक्षकाचीही चौकशी

घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी हे पथकासह दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, एटीएममधून किती रक्कम चोरण्यात आली याची चौकशी सुरू आहे. तसेच सुरक्षा रक्षक असताना ही चोरी झाल्यामुळे सुरक्षा रक्षकाचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

Last Updated : Feb 19, 2021, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details