नाशकात पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात शिरले चोर, चंदनाची झाडे तोडली - चंदनाची मोठी झाडं
थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरच मोर्चा वळविल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील तीन मोठी चंदनाची झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला.
![नाशकात पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात शिरले चोर, चंदनाची झाडे तोडली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3512288-thumbnail-3x2-aarti-singh.jpg)
पोलीस अधीक्षक आरती सिंह
नाशिक - शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरी होणाऱया चोरींच्या प्रकारात वाढ होत आहे. पण आता चोरट्यांनी थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरच मोर्चा वळविल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील तीन मोठी चंदनाची झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी प्रकरणाची माहिती देतांना नाशिक पोलीस