महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरात पार्किंगची व्यवस्था नाही मग, कारवाई का? टोईंग कारवाईवर नाशिकरांची संतप्त प्रतिक्रिया - नाशिक टोईंग कारवाई बातमी

स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांची दुरवस्था असताना तसेच शहरात पार्किंगची व्यवस्था नसताना ही कारवाई कशाला, असा प्रश्न नाशिकरांनी उपस्थित केला आहे.

नाशिक टोईंग कारवाई बातमी
nashik government towing action news

By

Published : Jul 13, 2021, 9:56 PM IST

नाशिक- गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या टोईंग कारवाईला सुरवात झाल्याने नाशिककरांचा चांगलाच संताप झाला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांची दुरवस्था असताना तसेच शहरात पार्किंगची व्यवस्था नसताना ही कारवाई कशाला, असा प्रश्न नाशिकरांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सुरू असलेली टोईंग कारवाई चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. ती तत्काळ बंद करा, अन्यथा नाशिककरांचा उद्देश होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

'शहरात पार्किंगची व्यवस्था नाही मग, कारवाई का करता?' -

नाशिक शहरात गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या टोईंग कारवाईला पुन्हा एकदा सुरवात केल्याने नाशिककरांचा चांगलाच संताप झाला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात शहरात पार्किंगची व्यवस्था नाही मग, कारवाई का करता? आम्ही वाहन चालवायची की नाही, असा संतप्त सवाल नाशिककरांनी उपस्थित केला आहे. बिल्डर हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पार्किंगची व्यवस्था न करता बांधकाम करतात व व्यवसाय सुरू झाल्यानंतर पार्किंगची मोठी अडचण होत असते, त्यामुळे अशा बांधकाम व्यावसायिकांवरदेखील कारवाई झाली पाहिजे असे मत सामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.

शहरात पार्किंगची व्यवस्था नाही मग, कारवाई का?

नागरिकांना मोठा आर्थिक फटका -

शहरातील काही प्रमुख मार्केटमध्ये अद्यापही पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे या नागरिकांनी खरेदीला किंवा इतर गोष्टीसाठी या परिसरात गेल्यावर वाहन कुठे उभे करायचे, असा सवाल आता नाशिककर विचारात आहेत. रस्त्याच्या बाजूला वाहन उभे केल्यावर गाडी टोईंग करून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात दंडदेखील भरावा लागत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आधी शहरात पार्किंगची व्यवस्था करा, मग टोईंग कारवाई करा, अशी मागणी नाशिककर करत आहेत.

हेही वाचा -VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गाठलं मंगल कार्यालय, लग्नाच्या दिवशीच नववधूवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details