येवला (नाशिक)- येवला शहरात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दोन दुकाने फोडून यातील रोख रक्कम आणि सामानाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरांचा तपास पोलीस करीत आहे.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
शहरातील शनी पटांगण भागातील श्रीकृष्ण मेडिकल या दुकानाचा शटरचा पत्रा वाकवून दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. यापाठोपाठच बस स्टॅन्ड स्ठित नोवेल्टी मोबाईल दुकानचाही शटरचा पत्रा वाकवून दुकानातील मोबाईल तसेच किरकोळ रक्कम असा एकूण पंचवीस ते तीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहे.