नाशिक -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने चित्रपटगृह, नाट्यगृह, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता 'विच्छा माझी पुरी करा' या नियोजित नाटकाला सुरुवात झाली आहे.
नाशकात शासन निर्णय झुगारून नाटकांचे प्रयोग सुरूच
या नाटकाला जवळपास ३५० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे शासन निर्णय झुगारून हे नाटक सुरू आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशकात शासन निर्णय झुगारून नाटकांचे प्रयोग सुरूच
या नाटकाला जवळपास ३५० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे शासन निर्णय झुगारून हे नाटक सुरू आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान हे नाटक संपल्यानंतर काही कलाकरांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, प्रेक्षकांनी नाटक झाले म्हणून आम्ही बघितले, अशा प्रतिक्रिया दिल्या.