महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Water Came From Trees : चक्क झाडातून वाहू लागला झरा, नागरिकांची गर्दी झाल्यानंतर अखेर सत्य झाले उघड - ओझरखेड येथील झाडातून वाहणारा झरा

ओझरखेड येथील गुलमोहराच्या झाडातून ( Water Came Out From Trees ) पाणी येऊ लागल्याने नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र हे पाणी झाडाखालून ( Water Came Out From Trees In Nashik ) गेलेली पाईपलाईन फुटल्याने त्यातून येत असल्याचे उघड ( The Truth has Revealed ) झाले. त्यामुळे नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला. झाडातून पाणी निघत असल्याची चर्चा सोशल माध्यमातून चांगलीच रंगली होती. त्यामुळे नागरिक दैवी चमत्कार असल्याचे समजून बाटल्यात पाणी भरुन नेत होते.

Water Came Out From Trees
झाडातून झरा निघत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी गर्दी

By

Published : Dec 27, 2022, 6:03 PM IST

नाशिक -वणी-दिंडोरी रस्त्यावरील ( Water Came Out From Trees ) ओझरखेड कॉलनीच्या बस स्थानकाजवळील गुलमोहराच्या झाडातून अचानक पाणी येऊ लागले होते. परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात झाडातून वाहणारे पाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी ( Water Came Out From Trees In Nashik ) केली होती. अनेक लोक मनोभावे पाणी निघणाऱ्या झाडाचे दर्शन घेत होते. तर काही लोक पाणी बाटल्यांमध्ये भरत होते. दुपारनंतर लाईट गेल्याने ओझरखेड धरणावरील शेतीसाठी ( The Truth has Revealed ) पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन बंद झाल्याने झाडातील पाणी ( Water Came Out From Trees ) आपोआप थांबले. अखेर सोशल मीडियावरील हे सत्य उघड झाले आहे.

झाडातून झरा निघत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी गर्दी

पाईपलाईन फुटल्याने निघत होते पाणीझाडाच्या खालून ओझरखेड धरण ते लखमापूर शेतीसाठी पाईपलाईनद्वारे पाणी जात होते. त्यातील एक पाईपलाईन ( Water Came Out From Trees In Nashik ) फुटल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्याने गुलमोहराच्या ( The Truth has Revealed ) पोकळ खोडातून पाणी पडत होते. तसेच पाणी पडत असलेल्या ठिकाणी छोटेसे पिंपळाचे झाड असल्याने लोकांना तो दैवी ( Water Came Out From Trees ) चमत्कार वाटला. मात्र, लाईट गेल्यानंतर हे पाणी कमी झाल्याने हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत स्पष्टता झाल्याने याबाबतच्या चर्चेला ब्रेक लागला आहे.

झाडातून वाहणारा झरा चर्चेचा विषयअलिकडच्या काळात काही विलक्षण घटना समोर आल्या की त्याची जोरदार चर्चा होत असते. तशीच काहीशी ही घटना असल्याने त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे ओझरखेड येथील झाडातून वाहणारा ( Water Came Out From Trees ) झरा चर्चेचा विषय ठरला होता. काही वर्षांपूर्वी झाडाच्या खालून पाईपलाइन करण्यात आली होती. त्यानंतर तिथे गुलमोहराचे झाड आपोआप उगवले होते. त्यानंतर त्याची वाढ होऊ लागली आणि थेट पाण्याच्या शोधत झाडाची मुळे पाईपलाइनमध्ये ( The Truth has Revealed ) गेली. त्यानंतर मुळांच्या सहायाने पाणी थेट झाडाच्या खोडातून बाहेर येऊ लागले. पाण्याचा दाब अधिक असला की झाडातून पाण्याचा झरा वाहत असल्याचे दृश्य निर्माण होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details