महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बालकांना अधिक धोका

कोरोनाच्या पहिल्या लाटेत 12 वर्षा खालील मुलांना ताप, खोकला अशा प्रकारचे सौम्य लक्षणे आढळली. मात्र, तरीही त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे 6 हजार बालकांना कोरोना झाला असला, तरी त्यातील बहुतांश बालकांना भरती करावे लागले नव्हते. तर 15 वर्षांपासून पुढील वयोगटातील मुलांमध्ये बधितांची संख्या 16 हजार 612 इतकी होती. यात मागील वर्षात 10 हजार हुन अधिक भर पडली असल्याचे दिसून आले आहे.

नाशिक कोरोना
नाशिक कोरोना

By

Published : Apr 5, 2021, 7:16 PM IST

Updated : Apr 6, 2021, 10:26 AM IST

नाशिक -कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरातील जेष्ठ आणि मध्यमवयीन लोकांना अधिक प्रमाणात झाला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांना आणि युवकांना अधिक प्रमाणात संसर्ग होतं असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 830 बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं असून, पालकांनी न घाबरता मुलांची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी डिसेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत 12 वर्षा खालील मुलांना ताप, खोकला अशा प्रकारचे सौम्य लक्षणे आढळली. मात्र, तरीही त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे 6 हजार बालकांना कोरोना झाला असला, तरी त्यातील बहुतांश बालकांना भरती करावे लागले नव्हते. तर 15 वर्षांपासून पुढील वयोगटातील मुलांमध्ये बाधितांची संख्या 16 हजार 612 इतकी होती. यात मागील वर्षात 10 हजार हुन अधिक भर पडली असल्याचे दिसून आले आहे.

माहिती देतांना डॉक्टर
मुलांचे प्रमाण अधिक0 ते 12 वयोगटात 8830 बालके अधिक बाधित आहेत. त्यात मुलांची संख्या 4 हजार 964 तर बालिकांची संख्या 3 हजार 866 इतकी आहे. तर 13 ते 25 वयोगटातील मुलांच्या प्रमाणात 15 हजार 637 इतकी तर 10 हजार 988 मुली बाधित असल्याचे आढळून आले आहे. यात मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.मुलांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नकाकोरोनाच्या मागील लाटे पेक्षा ही लाट लहान मुलांसाठी जास्त घातक आहे. यात मुलांना जुलाब,खोकला,सर्दी,पोटदुखी आदी लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी ह्याकडे दुर्लक्ष न करता मुलांची कोरोना चाचणी करणे गरजेचं आहे. काही ठिकाणी मुलांमुळे घरातील लोकं बाधित झाले आहे. कोरोनाचा हा दुसरा स्ट्रेन असू शकतो. मात्र, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नसून पालकांनी मुलांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ यांनी दिला आहे.
Last Updated : Apr 6, 2021, 10:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details