महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार? - NASHIK All India Marathi Literary Conference

प्रस्तावित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार हे निश्चित मानल जात आहे. साहित्य मंडळाच्या स्थळ पाहणी समितीने नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी परिसराची पाहणी केली आहे. याची घोषणा शुक्रवारी औरंगाबादला होणाऱ्या बैठकीनंतर केली जाण्याची शक्यता आहे.

NASHIL LATEST NEWS
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

By

Published : Jan 7, 2021, 2:33 PM IST

नाशिक- प्रस्तावित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार हे निश्चित मानले जात आहे. साहित्य मंडळाच्या स्थळ पाहणी समितीने नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी परिसराची पाहणी केली आहे. याची घोषणा शुक्रवारी औरंगाबादला होणाऱ्या बैठकीनंतर केली जाण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
संमेलन नाशिकमध्ये घेण्यात यावे अशी मागणी
मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्यात याव अशी मागणी लोकहितवादी मंडळाकडून करण्यात आली होती. साहित्य मंडळाच्या स्थळ पाहणी समितीने नाशिकच्या गोखले एज्युकेशन परिसरातील आर.वाय.के कॉलेज परिसराची पाहणी केली आहे. भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिकला तिसऱ्यांदा होणार हे निश्चित होईल, असे संकेत आजच्या पहाणी समितीच्या सदस्यांकडून पाहणी दौऱ्यात पाहायला मिळाले आहे. दिल्ली येथे साहित्य संमेलन व्हावे अशी मागणी केली आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून साहित्य संमेलन होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित साहित्यसंमेलन हे सर्व प्रकारची काळजी घेऊन करणार असल्याचा दावाही निमंत्रक संस्थेने केला आहे आत्ता अपेक्षित निर्णय उद्या होणाऱ्या औरंगाबादच्या महामंडळ बैठकीत घेणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार व साहित्य संमेलन नाशिक मध्ये होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details