नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज तीन ते चार हजार नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालय रुग्णांनी भरले असून रुग्णांच्या नातेवाइकांची बेड मिळण्यासाठी परवड होत आहे. मात्र, दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे बेड असून सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरही हतबल झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण ऑक्सिजन साठ्याच्या 95 टक्के ऑक्सिजन हे केवळ वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवूनही 50 टक्के ऑक्सिजन तुटवडा जाणवत असल्याचे खासगी हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढते असल्याने सर्वच रुग्णालयाचे सर्वच बेड फुल झाले आहेत. माझ्या रुग्णालयामध्ये 40 ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर बेड आहेत. मात्र, ऑक्सिजनचा पूर्ण पुरवठा होत त्यातील 10 बेड रिकामे ठेवावे लागत आहे. दिवसाला 1 हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना त्यात 300 लिटर ऑक्सिजनचा तुटवडा येत आहे. मला दिवसातून 100 फोन ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर बेडसाठी येतात. मात्र, बेड असूनही ऑक्सिजन नसल्याने आम्ही हतबल झालो असल्याचे एका खासगी रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय धुर्जंड यांनी म्हटले आहे.
95 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी
नाशिक जिल्ह्यात सद्य स्थितीत उद्योगासाठी 5 टक्के आणि वैद्यकीयसाठी 95 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्याबरोबरच तीन उत्पादकांच्या विस्ताराप्रमाणे तर एक उत्पादकाला ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी लगेच परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांच्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त माधुरी पवार यांनी ही माहिती दिली.
सिलिंडरच्या दरात भरमसाठ वाढ