नाशिक - राज्याचे लक्ष लागून असलेल्या ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी आता 2 मार्चला होणार आहे. (SC On OBC Reservation Petition) सुनावणी पुढे ढकलल्याने राज्यात महापालिका निवडणुकांचे भवितव्य अजूनही अंधातरीतच असून राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान, आरक्षणाचा निर्णय विरोधाता गेला तर देशभरातील ओबीसींना अडचणींचा सामना करावा लागेल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द ठरवले होते. त्यामुळे राजकीय दृष्ट्या मोठा पेच निर्माण झाला होता. त्या विरोधात महाविकास आघाडी व समता परिषदेने न्यायालयात आरक्षण पुन्हा बहाल करावे अशी मागणी केली. तसेच आयोग स्थापन करून इम्पेरिकल डाटा सादर केला. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण न्यायालयाने सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्याने मोठी निराशा झाली. ही सुनावणी आता दोन मार्चला होणार आहे.
निकाल आमच्या बाजूने लागेल