नाशिक- जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ( nandur madhyameshwar bird sanctuary ) साेमवारी (दि. 4 एप्रिल) रात्री वनवा पेटवून दिल्याची घटना घडली. यात हजारो पक्ष्यांच्या आधिवास व जैवविविधता धोक्यात आली आहे. मंगळवारी (दि. 5 एप्रिल) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
nandur madhyameshwar bird sanctuary : नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पेटले, आग आटोक्यात - जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र
जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ( nandur madhyameshwar bird sanctuary ) साेमवारी (दि. 4 एप्रिल) रात्री वनवा पेटवून दिल्याची घटना घडली. यात हजारो पक्ष्यांच्या आधिवास व जैवविविधता धोक्यात आली आहे. मंगळवारी (दि. 5 एप्रिल) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पक्ष्यांचा अधिवास -निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणावर असलेल्या तसेच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ख्यातकीर्त असलेले नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दरवर्षी देश-विदेशातून हजारो पक्षांचे थवे दाखल होत असतात. या पक्षांना बघण्यासाठी देशभरातील पक्षीमित्र येतात. त्याच नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य क्षेत्रात चापडगाव येथील पक्षी निरीक्षणाच्या शेवटच्या टाॅवर जवळ वणवा पेटला होता. ताे लावण्यात आल्याचे समाेर येत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पक्ष्यांचा अधिवास असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे लागलेल्या वणव्याची धग पक्षांना बसली आहे. या परिसरात असलेले गवताळ भागात राहणारे पक्षी येथील असलेल्या वनस्पती तसेच जैवविविधतेला मोठा फटका बसणार असल्याचे जाणकार नागरिकांनी सांगितले आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असती तरी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात आजही दहा ते पंधरा हजारांहून अधिक पक्षी येथील पाणथळ क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षांपासून अज्ञातांकडून जाणीवपूर्वक येथे वनवा पेटवल्याच्या घटना घडतात. त्या प्रमाने आजही वनवा पेटला आहे.