नाशिक- कोरोनाचा ( Corona ) ऑमिक्राॅन ( Omicron ) हा नवा विषाणू अधिक जीवघेणा असून दक्षिण आफ्रिका देशातून येणार्या प्रवाशांची चाचणी करुन क्वारंटाईन करण्याचे आदेश राज्यशासनाकडून सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात ओझर विमानतळावर परदेशातून येणार्या प्रवाशांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यंत्रणेला दिले आहेत.
नवीन व्हेरियंट डेल्टापेक्षा भयानक...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी व्हिसीद्वारे रविवारी ( दि. 28 ) राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी संवाद साधत नवीन व्हेरियंटबाबत उपाययोजनांचा आढावा घेत सूचना दिल्या. नवीन व्हेरियंट डेल्टापेक्षा भयानक असून दोन ते तीन मिनिटात त्याची लागण होते. हा व्हेरियंट कोरोनाच्या तिसर्या लाटेला निमित्त ठरू शकतो. ते बघता दक्षिण आफ्रिकेसह ज्या ठिकाणी हा व्हेरियंट आढळला. त्या देशातून येणार्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली जाईल व त्यांना क्वारंटाईन ठेवणे बंधनकारक असेल, असा निर्णय घेण्यात आला. तसेच लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. जेणेकरुन नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी त्याची परिणामकारकता कमी राहील. तसेच पहिली व दुसर्या लाटेचा अनुभव बघता तिसर्या लाटेच्या सज्जतेची तयारी केली होती. पण, नव्या व्हेरिंयटची तीव्रता लक्षात घेता बेड, ऑक्सिजन व इतर आरोग्य सुविधेचा तुटवडा भासू शकतो. ते पाहता नव्याने सर्व तिसरी लाट सज्जतेचा आढावा घेतला जाईल, अशा सूचना बैठकीत जिल्ह्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.
हे ही वाचा -ST Workers Strike : नाशिकमध्ये एसटी प्रवासासाठी पोलिसांचा बंदोबस्त; कठोर कारवाईचा इशारा