नाशिक : खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ( Thackeray group sacked Bhau Chaudhary ) हकालपट्टी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुनील भास्करराव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख, नाशिक ग्रामीण ( उद्धव गट ) यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा ( Sunil Patil resigned ) राजीनामा दिला आहे.
Thackeray group in Nashik : ठाकरे गटाला धक्का, संपर्क प्रमुख पदाची हकालपट्टी होताच जिल्हा प्रमुखांचा राजीनामा - सुनील भास्करराव पाटील राजीनामा
शिवसेनेच्या ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का ( Thackeray group in Nashik ) बसला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी ( Thackeray group sacked Bhau Chaudhary ) करण्याचे ट्विट करून जाहीर केले. त्यानंतर नाशिकच्या शिवसेना जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिला आहे.

उद्धव ठाकरे गट नाशिक
सुनील पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय, असे सुनील पाटील फेसबुकवर म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो. हम नाशिककर आपके साथ है, असेदेखील सुनील पाटील म्हणाले ( Sena leader Sunil Patil fb post ) आहेत.
Last Updated : Dec 22, 2022, 8:45 AM IST