नाशिक -शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 मे दुपारी 12 पासून ते 22 मार्चपर्यंत हा लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुढे बोलताना नाशिक कैलास जाधव यांनी म्हटले आहे की, आज जिल्हा आपत्ती निवारणची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांडये, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओ, पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती. या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात केवळ वैद्यकीय आस्थापणांना सूट देण्यात आली असून, बाकी सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. औद्योगिक वसाहती देखील केवळ इन हाऊस सुरू राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक वाहनांनाच पेट्रोल मिळणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.