नाशिक - वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर 45 दिवस दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 22 जुलैपासून 5 सप्टेंबर पर्यंत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद राहणार आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशा सूचना देखील शासनाच्या पुरतत्व विभागाकडून देण्यात आल्यात आहेत.
भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन -येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतसमस्त होते येणार आहेत,यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालया नजीक श्री भगवतीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे तसेच दरम्यान भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्तीनिवास व इतर सुविधा या कायम असणार आहे असेही मंदिर प्रशासनाचे वतीने सांगण्यात आले आहे.