निफाड ( नाशिक ) :उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे येवला शहरासह ( Cold Winds Flow From North ) तालुक्यात तसेच निफाडकारांना देखील थंडीची हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांपासून तापमानात घसरण होत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा घसरल्याने संपूर्ण तालुका गारठून निघाला ( Niphad Taluka Freeze ) आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली ( Temperature Drop In Niphad ) आहे. या थंडीपासून ऊब मिळण्यासाठी येवल्यात ठीक ठिकाणी शेकटया पेटल्याचे चित्र रात्रीच्या व पहाटेच्या सुमारास दिसत असून दिवसेंदिवस थंडीमध्ये वाढ होत आहे.
कृष्णाकाठ बहरला :सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल होतात. यंदा पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडार परिसरात सध्या पक्षांची शाळा भरली आहे. उथळ पाण्यावरील पहाटेच्या धुक्याची झालर बाजूला होताच, पक्षांचा किलबिलाट काठावरची नीरव शांतता भंग करत आहे. या कोंडार परिसरात स्थानिक पक्षांबरोबर देश विदेशातील पाहुण्या पक्षांचे आगमन झाले आहे. गतवर्षी भुवई बदक, छोटा आर्ली हे नवीन पाहूणे पहायला मिळाले होते. तर यावेळी 'करकरा क्रोंच' पक्षी हे यावर्षीचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. या रूबाबदार पक्षाच्या दोन जोड्या लक्षवेधक ठरल्या आहेत. जिल्ह्यात प्रथमच गेले दोन दिवस या पक्षाची नोंद झाल्याची माहिती आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे.