नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या खर्चावर आयकर विभागाला नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, आयकर विभाग सर्व पक्षांच्या पैशांच्या व्यवहारावर लक्ष ठेवणार आहे. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास सेल टॅक्स आणि एक्साईज विभाग संयुक्तरित्या कारवाई करतील. आयकर विभागाकडून २४ मतदारसंघात नोडल ऑफीसर नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक खर्चावर आयकर विभागाची नजर; २४ मतदारसंघावर नोडल ऑफीसरची नियुक्ती - लोकसभा
नेत्यांचे खासगी चॉपर्स आणि विमानांवर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. यासाठी २८ जणांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. नोडल ऑफीसर आणि व्हेरिफिकेशन ऑफीसरची नियुक्ती केली जाणार आहे
नेत्यांचे खासगी चॉपर्स आणि विमानांवर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. यासाठी २८ जणांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. नोडल ऑफीसर आणि व्हेरिफिकेशन ऑफीसरची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, एअर सर्विलन्स केले जाणार आहे. विमानतळावरही यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. आयकर विभागाचे मुख्य संचालक जयराज काजला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
१४ मतदारसंघासाठी न्यायक्षेत्रीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चोवीस तास काम करणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २४ मतदारसंघ आणि ६ विमानतळावर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. यात गोंदिया, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, नागपूर, नांदेड यांचा समावेश आहे. नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी १८००२३३३७८५ या टोल फ्री क्रमांकावर, ९४०३३९१६६४ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर, तसेच ०७१२२५२५८४४ या फॅक्स क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.