महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये गॅस टँकर उलटला; आठ तासांच्या प्रयत्नानंतर टँकर उभा करण्यास यश..

पुणे महामार्गच्या दिशेने द्वारका चौकातून टँकर सिन्नर येथे जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने टँकर वळण घेताना उलटला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास वाहनांची वर्दळ कमी असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अपघात
अपघात

By

Published : Jun 18, 2021, 11:43 AM IST

Updated : Jun 18, 2021, 12:59 PM IST

नाशिक- मुंबईकडून सिन्नरकडे जात असताना नाशिक शहरातील द्वारका चौकात उलटलेला गॅस टँकर उलटल्याची घटना घडली होती. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर, सुरक्षितरित्या गॅस टँकर उभा करण्यात आला आहे.

तीन क्रेनच्या साह्याने टॅंकर उभा
नाशिक शहरांमधील द्वारका चौक येथे पहाटे पाच वाजेच्या सुमारास एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. द्वारका चौकात येणारी सर्वच महामार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली होती. सलग 8 तासंपासून, तीन क्रेनच्या साह्याने टॅंकर उभा करण्याचे प्रयत्न सुरू होते, अखेर या प्रयत्नांना यश आले आहे.

जीवितहानी झाली नाही
भारत पेट्रोलियम गॅसचा टँकर 17 टन एलपीजी गॅसने भरलेला होता. पुणे महामार्गच्या दिशेने द्वारका चौकातून टँकर सिन्नर येथे जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने टँकर वळण घेताना उलटला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास वाहनांची वर्दळ कमी असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त टँकरचा वॉल दबल्यामुळे हा टँकर क्रेनने उचलत असताना या टँकरमधून गॅस लिकेज होण्याची शक्यता असल्याचे मत कंपनीच्या तंत्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आले होते. गॅस लिकेज होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करून हळूवारपणे टँकर उभा करण्यात आला.

Last Updated : Jun 18, 2021, 12:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details