नाशिक -मनमाड येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी इंधन प्रकल्पातील टँकर चालक-मालकांनी काम बंद आंदोलन केले. प्रकल्पाचे अधिकारी मनमानी करून त्रास देत असल्याचा आरोप, आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पातून टँकरद्वारे केला जाणारा पेट्रोल, डिझेलचा पुरवठा ठप्प झाला असून यामुळे इंधन टंचाई भासू शकते.
हेही वाचा -महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'
मनमाड स्थित असलेल्या पानेवाडीच्या हिंदुस्थान पेट्रोलियम इंधन कंपनीच्या टँकर चालक-मालकांनी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाला वैतागून आज सकाळी अचानक कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन करत संप पुकारला. अचानक झालेल्या या संपामुळे उत्तर महाराष्ट्रसह मराठवाडा या भागात इंधन पुरवठा खुंटला असून यामुळे आज इंधनाची चणचण भासू शकते.