महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहित्य संमेलन ऑनलाईन घ्या! आम आदमी पार्टीची मागणी - aam aadmi party on sahitya sammelan

सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. महामारीचे रुग्ण हे वाढू लागले आहे. यामुळे हे साहित्य संमेलन घेऊ नये अशी मागणी वेगवेगळ्या समाज घटकांकडून होत आहे.

Nashik
नाशिक साहित्य संमेलन

By

Published : Mar 5, 2021, 1:48 PM IST

नाशिक -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ऑनलाईन घ्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. नाशिक मध्ये 26 ते 28 मार्च या दरम्यान 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाला एकूण चार कोटी रुपये पर्यंतचा खर्च येणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. महामारीचे रुग्ण हे वाढू लागले आहे. यामुळे हे साहित्य संमेलन घेऊ नये अशी मागणी वेगवेगळ्या समाज घटकांकडून होत आहे. तर हे साहित्य संमेलन होणारच अशी भूमिका साहित्य संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळ आणि काही शहरातील समाजिक संस्था घेत आहेत. या पार्श्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आप पार्टीचे जितेंद्र भावे म्हणाले की, अखिल भारतीय साहित्य संमेलन हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावे. यामध्ये साहित्याशी निगडीत आणि साहित्यप्रेमी नागरिक सहभागी होऊ शकतील आणि नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमेलन देखील एक नवीन आदर्श घेऊन समोरी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज समाजामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परीस्थिती वर खर्च करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन मंडळ यांनीदेखील संमेलनाचा खर्च हा जास्त न करता तो निधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे निर्माण परीस्थितीवर खर्च करावा अशी मागणी आप पक्षाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details