नाशिक - कोरोनामुळे मास्कचा वापर अनिवार्य झाला आहे. सर्वसाधाणतः कोरोनाच्या विषाणुपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरला जातो. मात्र, मास्क हौसेसाठी वापरणाऱ्यांची कमीदेखील आपल्या देशात नाहीच. आतापर्यंत आपण चांदी आणि सोन्याचे मास्क बनवून घेतल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. त्यातच एका हौशी नाशिककराची भर पडली आहे. शहरात गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले टेलर व्यावसायिक मकरंद साळी यांनी तब्बल 2 लाखांचा मास्क स्वतःसाठी बनून घेतला आहे. साळी यांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोना काळात 7 हजार मास्क बनवून त्याचे गरजू व्यक्तींना वाटप केले आहे.
हौसेला मोल नाही; नाशिकच्या व्यावसायिकाने बनवला चक्क सोन्याचा मास्क - नाशिक सोन्याचा मास्क
नाशिकचे मकरंद साळी हे टेलर व्यावसायिक आहेत. त्यांना सोने घालण्याची प्रचंड हौस. त्यांनी विचार केला की आपण इतर दागिने सोन्याचे घालू शकतो तर मास्क का नाही. त्यानंतर त्यांनी तब्बल २ लाख रुपये खर्च करून सोन्याचा मास्क बनवून घेतला. त्यांच्या या मास्कची सध्या नाशकात चांगलीच चर्चा आहे.

सध्या प्रत्येकजण हा आपल्या सोईनुसार मास्क वापरत आहे. काही कापडी मास्क वापरतात, तर काही जण एन 95 मास्क वापरताना दिसतात, तर काही जण मॅचिंग आणि विविध प्रकारच्या कपड्यांपासून तयार केलेले मास्क वापरतात. त्यातच काही हौशी लोकांनी चांदी आणि सोन्याचे मास्कही बनवून घेतले आहेत. नाशिकचे मकरंद साळी हे टेलर व्यावसायिक आहेत. त्यांना सोने घालण्याची प्रचंड हौस. त्यांनी विचार केला की आपण इतर दागिने सोन्याचे घालू शकतो तर मास्क का नाही. त्यानंतर त्यांनी तब्बल २ लाख रुपये खर्च करून सोन्याचा मास्क बनवून घेतला. त्यांच्या या मास्कची सध्या नाशकात चांगलीच चर्चा आहे.