महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डेंग्यू सदृश आजाराचा प्रादुर्भाव, नागरिकात भीती - dengue

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून तिघांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य

By

Published : Oct 13, 2019, 12:21 PM IST

Updated : Oct 13, 2019, 12:48 PM IST

नाशिक - बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून तिघांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


गावकऱ्यांनी मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून गावात अनेक दिवसांपासून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबविली गेलेली नाही. तसेच ग्रामपंचायतीने औषध किंवा धूर फवारणी केली नाही. यामुळे गावात डासांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांना मलेरिया, डेंग्यू तसेच साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा - भाजपच्या जागा जास्त असल्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होतील- रामदास आठवले

ताहाराबाद गावात गौरी महाजन (वय 11 वर्षे), कोमल साळवे (वय 22 वर्षे) व पंडित पानपाटिल (वय 42 वर्षे) असे तीन डेंग्युसद्दश्य आजाराचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णांला ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अजूनही गावात डेंग्युसद्दश्य रुग्ण असण्याची शक्यता आहे.


ग्रामपंचायतींकडे वारंवार तक्रार करून देखील गावातील पाण्याचे डबके तसेच गडारींतील सांडपाण्याचे नियोजन, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी नियमित फिरत नसल्याने घाणीच्या साम्राज्य वाढून डासांचे प्रमाण वाढत आहे. तसेच यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना ग्रामपंचायतीकडून होत नसल्याने ग्रामपंचायतीचा कर का भरायचा असा संतप्त सवाल नागरिकांनी करून ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबविण्यापाठोपाठ धूर व औषध फवारणी करून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम न राबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा - 'संपूर्ण महाराष्ट्राचं ठरलंय, वातावरण फिरलंय'

Last Updated : Oct 13, 2019, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details