महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर होणार तडीपारीची कारवाई; पोलिसांचा इशारा - nylon sellers in Nashik

गेल्या काही वर्षपासून नायलॉन मांजावर बंदी असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. मागील वर्षी नाशिक पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई करत लाखो रुपयांचा मांजा जप्त करत संबंधित व्यक्तींवर कारवाई केली होती. मांजामुळे काही नागरिकांना जीव गमवावा लागला तर काहीं दुखावत झाली होती. त्यामुळेआता पोलिसांनी कडक भूमिका घेत घेतल्याचे दिसून येत आहे.

नायलॉन मांजा
नायलॉन मांजा

By

Published : Jan 6, 2022, 9:36 AM IST

नाशिक - शहरात नायलॉन मांजाचा वापरामुळे जिवितहानी झाल्यास संबंधितांवर पोलिसांकडून थेट तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासाने दिला आहे. यंदाच्या संक्रांतीला नाशकात नायलॉन मांजा वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर होणार तडीपारीची कारवाई

संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी 4 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत नायलॉन मांजाची विक्री, पुरवठा, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. नियमांचे कोणी उल्लंघन केले तर संबंधितांना थेट 4 महिने ते 1 वर्षांपर्यंत शिक्षा देखील होऊ शकते. तसेच या मांजाचा कोणी वापर केला आणि त्यामुळे कोणाच्या जीवितास हानी झाली तर त्या दोषींवर थेट तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील नाशिक पोलिसांनी दिला आहे. तसेच लहान मुले मांजा विक्री करतांना, उडवताना आढळल्यास त्यांचा पालकांवर होणार कारवाई करणार आहे.

का घेतला निर्णय..

गेल्या काही वर्षपासून नायलॉन मांजावर बंदी असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. मागील वर्षी नाशिक पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई करत लाखो रुपयांचा मांजा जप्त करत संबंधित व्यक्तींवर कारवाई केली होती. मांजामुळे काही नागरिकांना जीव गमवावा लागला तर काहीं दुखावत झाली होती. त्यामुळेआता पोलिसांनी कडक भूमिका घेत घेतल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details