नाशिक - मालेगावच्या माेमीनपुरा भागातील ( Mominpura Malegaon ) एका गाळ्यात छापा टाकून शहर पाेलिसांनी ३० धारदार तलवारी जप्त केल्या (Sword Seized in Malegaon ) आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या माेठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा का केला हाेता, त्यांचा उद्देश काय हाेता याचा तपास पाेलिसांनी ( Nashik Police ) सुरु केला आहे.
मोमीनपुऱ्यातून ३० धारदार तलवारी जप्त गुप्त माहितीच्या आधारे छापा -
मोहम्मद मेहमुद अब्दुल रशिद अन्सारी ऊर्फ मस्तान (रा. कमालपुरा, मालेगाव) आणि मोहम्मद बिलाल शब्बीर अहमद उर्फ बिलाल दादा (रा. इस्लामपुरा, मालेगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील (District Superintendent of Police Sachin Patil ) यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाई सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मालेगाव शहरात काही व्यक्ती अवैध शस्त्र ( Illegal Weapon ) बाळगत आहेत, याची गुप्त माहिती मिळाली. त्याच दिवशी दुपारी हा छापा टाकण्यात आला. घटनास्थळाहून दोघांना अटक करण्यात आली. तर रात्री उशीरा तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.
गाळ्यात छापा -
मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे ( Malegaon City Police Station ) पोलीस निरीक्षक घुसर यांनी पथकासह हद्दीतील मोमीनपुरा परिसरातील दालवाला चौकाजवळ मुल्ला बाबा चक्कीच्या पाठीमागील एका गाळ्यात छापा टाकला. तेव्हा दाेघांच्या ताब्यातील ३० धारदार तलवारी मिळून आल्या. ही कामगिरी महिला सहायक निरीक्षक सावंजी, उपनिरीक्षक घुगे, हवालदार महाले, पाेलिस नाईक बनकर, निकम, शिपाई गोसावी, डोंगरे, शिंदे यांनी केली आहे.