नाशिक - ग्रामीण पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावजवळ एका वाहनातून येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. संबंधित वाहनातून तब्बल 40 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
पवारवाडी हद्दीतील हॉटेल मिड्डेजवळ एका वाहनातून शस्त्र मालेगावात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. त्यातून 40 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. हा शस्रसाठा कुठून आला होता,आणि नेमका कुठे घेऊन जात होता, यासंदर्भात अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.