नाशिक- दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे मुदतबाह्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्वीट मार्टवरती ग्रामपंचायतीने कारवाई केली आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद होती. आता अनेक दुकाने सुरु झाली आहेत. अशात स्वीटमार्टमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचा अर्ज कसबे वणी येथील आरोग्य सेवक यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केला. ग्रामपंचायतीने याबाबत चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.
वणीत मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री, स्वीट मार्ट सील - वणीत मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री
दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे मुदतबाह्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्वीट मार्टवरती ग्रामपंचायतीने कारवाई केली आहे. स्वीटमार्टमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचा अर्ज कसबे वणी येथील आरोग्य सेवक यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केला. याबद्दलची माहिती मिळताच कसबे वणी येथील ग्रामपंचायत विभागाने चौकशी करून एक दुकान सील केले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडीच महिने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. हॉटेल, स्वीट मार्ट , ढाबे , खाद्य पदार्थांची दुकाने असे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद होते. परंतु, २३ मेपासून स्थानिक प्रशासनाने सकाळी ९ ते ५ पर्यंत काही दुकाने उघडण्यास परवारगी दिली. यानंतर खाद्य पदार्थांच्या दुकानांमध्ये मुदतबाह्य पदार्थांची विक्री केली जात होती. याबद्दलची माहिती मिळताच कसबे वणी येथील ग्रामपंचायत विभागाने चौकशी करून एक दुकान सील केले आहे. ग्रामसचिवालयाचे ग्रामसेवक जी आर आढाव यांनी याबद्दलची माहिती दिली.