नाशिक-घरगुती वीज ग्राहक व शेतीपंपाचे कोरोना काळातील संपूर्ण वीजबिल माफ करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. पंधरा दिवसात वीजबिल माफीची घोषणा सरकारने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे व घरगुती वीज ग्राहकांचे अतोनात नुकसान झालेले असून येत्या पंधरा दिवसात राज्य सरकारने वीजबिल माफीची घोषणा करावी. या मागणीचे निवेदन कळवण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अभियंता नितीन अंबडकर यांना देण्यात आले. पंधरा दिवसांच्या आत वीजबिल माफीची घोषणा न केल्यास मंत्र्यांना महाराष्ट्रात गावबंदी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांनी दिला आहे.