महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेशनकार्डवर गोडतेल व साखर अल्पदरात द्या, अन्यथा भीक मागो आंदोलन- स्वारीप - demand of sugar in concession rate

बाजारात 140 रुपये किलो दराने गोडेतेल तर साखर 38 किलो रुपये दराने मिळते. त्यामुळे गोडेतेल 50 रुपये दराने व साखर 15 रुपये किलो दराने रेशन दुकानात वाटप करावी, अशी मागणी स्वारीपने केली आहे.

swabhimani republican party worker
स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देताना

By

Published : Mar 22, 2021, 3:11 PM IST

येवला ( नाशिक) - रेशनकार्डवर गोडतेल व साखर अल्पदरात द्या, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने (स्वारीप) करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा स्वारीपकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांवर महागाईचे दोन हात करत उपासमारीची वेळ येऊन ठेवली आहे. राज्य सरकारकडून रेशन कार्डावर कधी मका तर कधी बाजरीचे वाटप सुरू आहे. परंतु तालुक्यात मका व बाजरी वाटप करण्याऐवजी रोजच्या दैनंदिन जीवनात असलेले गोडतेल व साखर या जीवनावश्यक वस्तू आहे. बाजारात 140 रुपये किलो दराने गोडेतेल तर साखर 38 किलो रुपये दराने मिळते. त्यामुळे गोडेतेल 50 रुपये दराने व साखर 15 रुपये किलो दराने रेशन दुकानात वाटप करावी, अशी मागणी स्वारीपने केली आहे. जेणेकरून सर्वसामान्य माणसाच्या मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यांच्या कुटुंबाला मोठी मदत होऊ शकेल, असे स्वारीपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी म्हटले आहे.

रेशनकार्डवर गोडतेल व साखर अल्पदरात द्या


हेही वाचा-"निलंबनाची मागणी करणाऱ्यांचेच परमबीर हे आज 'डार्लिंग' झालेत"


भीक मांगो आंदोलनाचा इशारा....
गरजू लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देऊन त्यांना त्वरित धान्य द्यावे व गोडेतेल व साखर अल्पदरात द्यावे अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून प्रांताधिकारी सोपान कासार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांनी दिला आहे.

हेही वाचा-'लेटर बॉम्ब' प्रकरणावर महाराष्ट्र काँग्रेस दिल्लीच्या हाय कमांडला पाठवणार अहवाल

दरम्यान, राज्यांमधील काही शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details