नाशिक- मित्रासोबत लॉजवर गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. सीबीएस परिसरातील सिटी पॅलेस हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.
नाशिकच्या सीबीएस चौकातील हॉटेलमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू - नाशिक तरुणीचा संशयास्पद मृत्यू
नाशिकमधील वसंतराव वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अर्चना भोईर (वय 21) ही तरुणी बी.एस.सीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. ती काल आपला मित्र तन्मय धानवा याच्या सोबत लॉजवर आली होती.
नाशिकमधील वसंतराव वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अर्चना भोईर (वय 21) ही तरुणी बी.एस.सीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. ती काल आपला मित्र तन्मय धानवा याच्या सोबत लॉजवर आली होती. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास तिचा मित्र तन्मय हा तिच्या सोबतच हॉटेलमधील रूममध्ये असताना तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमका हा मृत्यू कसा झाला? याबत माहिती मिळाली नाही. तिला मित्रानेच मारले, की अन्य काही कारणांनी तिचा मृत्यू झाला, याबत अद्याप तरी पोलिसांकडून माहिती मिळालेली नसून तन्मय धानवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, मुलीच्या वडिलांनी तन्मय हा मुलीला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
मयत मुलीच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात
आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हॉटेल सिटी पॅलेस येथून फोन आला कि, एक मुलगी हॉटेलच्या खोलीमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पोलिसांआधीच मुलीचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सरकारवाडा पोलीस करत असून या घटनेची माहिती नातेवाइकांना मुलीसोबत असणाऱ्या मित्रानेच दिली असल्याने पोलिसांनी मयत मुलीच्या मित्राला ताब्यात घेतल आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत असल्याचे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.