महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाशिकचे स्वॅब तपासणीसाठी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवणार' - corona news in nashik

दिवसेंदिवस नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने रोज 300 स्वॅब तपासणीसाठी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

chhagan bhujbal
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ

By

Published : May 7, 2020, 7:12 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. तसेच कोरोना संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने रोज 300 स्वॅब तपासणीसाठी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक असून त्याबाबत काळजी घ्यायला हवी. तसेच सकाळी नऊ ते पाच दुकाने उघडायला हरकत नसल्याचेही छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते. मालेगावमध्ये जिथे पोलीस कमी पडत आहे तिथे होमगार्ड दिले जातील, त्यांच्या मानधनाची देखील तरतूद केली आहे. कमी जागेत जास्त लोक राहतात त्यामुळेही प्रादुर्भाव वाढतो असा निष्कर्ष देखील छगन भुजबळ यांनी काढला. यासोबतच स्वॅब मोठ्या संख्येने संकलीत होत असल्याने आकड्यांचा गोंधळ होऊ शकतो, अशी कबुली पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मालेगावमध्ये दंगे सुरू नाहीत, त्यामुळे मिलिटरीची आवश्यकता नसल्याचे भुजबळ म्हणाले.

सुरूवातीला आपल्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग आज तालुकास्तरावर ग्रामीण भागातही जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपसातील समन्वय बळकट करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब नमुन्यांचे अहवाल तत्काळ लवकरात लवकर मागवून पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांवर तत्काळ इलाज कसे करता येतील, यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रलंबित असलेले स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे स्थानिक लॅब, आंध्र प्रदेशातील किट पुरवठादार, जे.जे.रूग्णालयात नव्याने कार्यान्वित होणाऱ्या लॅबच्या माध्यमातून तत्काळ कसे प्राप्त करून घेता येतील याचे नियोजन करावे. जेजेमध्ये नव्याने होणाऱ्या लॅबमध्ये दिवसाला 300 नमुन्यांच्या तपासणीची क्षमता नाशिकसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल.

कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी. इतर आजारांचे पेशंट हे कोरोना संशयीत नाहीत. त्यांना घरीच अलगीकरण शक्य आहे. ज्यांना शक्य नाही, त्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्यात यावा, असेही भुजबळ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details