नाशिक- दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर युवकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी संशयीत युवकास अटक केली. आठवीत शिकणारी मुलगी शाळा सुटल्यानंतर गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) सायंकाळी आपल्या घरी जात असताना कार्तिक तानाजी पवार (वय 19 वर्षे, रा. खडक सुकेना) याने तिचे तोंड दाबून द्राक्षबागेत नेत अत्याचार केला.
या मुलीने घरी जात घटनेची माहिती आपल्या आई-वडिलांना दिल्यावर पीडितेच्या आई-वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत संशयित युवकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.वि.चे कलम 376 ,506 पोक्सो कायदा कलम 4 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला.