नाशिक -जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. सुरगाणा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, इगतपुरी या चार तालुक्यात सक्रिय रुग्ण नगण्य आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे नाशिक जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, आता पर्यंत नाशिक जिल्ह्यात 3 लाख 96 हजार 353 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 3 लाख 86 हजार 03 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1 हजार 738 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आत्तापर्यंत 8 हजार 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण -
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 117, बागलाण 67, चांदवड 92, देवळा 19, दिंडोरी 93, इगतपुरी 23, कळवण 19, मालेगाव 48, नांदगाव 53, निफाड 145, पेठ 03, सिन्नर 242, सुरगाणा 0, त्र्यंबकेश्वर 4, येवला 41 अशा एकूण 967 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 706, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 52, तर जिल्ह्याबाहेरील 14 रुग्ण असून असे एकूण 1 हजार 737 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.