नाशिक:विचारण्याचा घटनाविरोधी, मानवताविरोधी आहे,अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच हा प्रकार राज्य शासनाची असंवेदनशीलता व आजारी मानसिकता दाखवणारी आहे, असाही हल्लाबोल त्यांनी केला. शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. ते तत्काळ थांबवावेत अशी मागणी अजित पवारांनी केली होती. आता हीच मागणी अंनिसने केली आहे.
जात लिहिल्याशिवाय उपचार नाही: आरोग्य विभागाच्या वतीने लोकसेवेत समर्पित असलेल्या शासकीय दवाखान्यांमधून उपचारासाठी रुग्ण गेला असता त्याला प्रथम केसपेपर काढावा लागतो. या केसपेपरमध्ये रुग्णाला स्वतःबद्दलची माहिती भरावी लागते; मात्र आता ह्या केस पेपरवर रुग्णाने त्याच्या जातीचा उल्लेख करावा, यासाठी एक कॉलम असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत अंनिसच्या कार्यकर्त्यांना आढळून आलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील एका शासकीय दवाखान्यात एका रुग्णाला त्याची जात लिहिल्या नंतरच त्याच्यावर पुढील उपचार करण्यात आले असल्याचे समजले आहे.
वैद्यकीय विभागाकडून अजब खुलासा:याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी यासंबंधी अतिशय अतार्किक,अजब व धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, काही विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये विशिष्ट आजार असतात. त्यावर उपचार करण्यासाठी हा कॉलम असून शासनाकडूनच हा 'फॉर्मेट' आला आहे. म्हणजेच जातभेदाला खतपाणी घालण्याचा असंवैधानिक प्रकार आपल्या आरोग्य खात्याकडूनच म्हणजे शासनाकडूनच होतो आहे. अशी शंका आम्हाला वाटत असल्याचे अंनिसने म्हटले आहे.