महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुकानदाराचा सल्ला शेतकऱ्याला पडला महागात...दोन एकरातील ऊस जळून खाक! - fertilizer shops in nashik

येवल्यात दुकानदाराचा सल्ला एका शेतकऱ्याला चांगलाच महागात पडला आहे. अखेर या शेतकऱ्यावर मुख्यमंत्री व कृषी मंत्री दादा भुसे व पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिण्याची वेळ आली आहे.

nashik farming news
दुकारदाराचा सल्ला शेतकऱ्याला पडला महागात...दोन एकरातील ऊस जळून खाक!

By

Published : Jul 16, 2020, 2:24 PM IST

नाशिक - येवला तालुक्यात आडगाव चौथा गावातील ऊस उत्पादक शेतकरी दामोदर पवार यांनी चुकीचे तणनाशक फवारल्याने दोन एकरावरील जळून खाक झाला आहे. कृषी सेवा केंद्रातील दुकानदाराने तणनाशक फवारणीसाठी चुकीचे औषध दिल्याने या शेतकऱ्याला नुकसानाला सामोरे जावे लागले.

दामोदर पवार यांनी दोन एकरात लागवड केलेल्या उसाच्या फवारणीसाठी तणनाशक औषध विकत घेतले. दुकानदाराच्या सल्ल्याने त्यांनी औषध फवारणी केली. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संपूर्ण ऊस पूर्णपणे वाळण्यास सुरुवात झाली. दोनच दिवसात पूर्ण दोन एकर शेत वाळून खाक झाले.

दुकारदाराचा सल्ला शेतकऱ्याला पडला महागात...दोन एकरातील ऊस जळून खाक!

हा संपूर्ण प्रकार दुकानदाराच्या निदर्शनास आणून देताच दुकानदाराने या शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर संतप्त शेतकऱ्याने संबंधित दुकानदाराबद्दल तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. आठ दिवसात संबंधित कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी बसण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला.

तसेच शेतकऱ्याने मुख्यमंत्री व कृषी मंत्री दादा भुसे व पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही पत्र पाठवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details