नाशिक- वाराणसीकडून मुंबईकडे जाणारी लोकमान्य टिळक कामयानी एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सोमवारी रात्री अचानक आग लागली. इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एस ११ व बाजूच्या दोन्ही बोगिंना आग लागल्याने प्रवाशांमध्ये धावपळ उडाली. यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते
कामयानी एक्सप्रेसला मनमाड स्थानकावर अचानक आग; प्रवाशांची धावपळ - मनमाड रेल्वे स्थानक
ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.
ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर मनमाड स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मनमाड रेल्वे स्थानकामध्ये मुंबईकडे जाणारी कामायनी एक्सप्रेस येऊन पोहोचल्यानंतर काही काळात अचानकपणे बोगीच्या खालच्या बाजूला आग लागल्याची चर्चा सुरू झाली. यावेळी गाडीमध्ये प्रवास करणार्या काही प्रवाशांनी चालू गाडीमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासन या घटनेमागच्या कारणांचा शोध घेत आहे.