येवला ( नाशिक ) -येवला तालुक्यातील गोल्हेवाडी - सायगाव रस्ता तसेच त्या लगत असलेला जो शिवरस्ता आहे अशा दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था ( Bad Condition Of Roads ) झाली असून अक्षरशः येथील 30 ते 40 शालेय विद्यार्थीसह परीसरातील ग्रामस्थांना चिखल तुडवत ( muddy roads ) तसेच पाण्यातून वाट काढत ये -जा करण्याची वेळ येत आल्याने रस्ता तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थ ( Villagers ) करीत आहे. गेल्या दहा वर्षापासून रस्त्याची मागणी करून देखील संबंधित विभाग सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहे अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी ( villagers Angry reactions ) दिल्या आहे.
Bad Condition Of Roads In Yeola : विद्यार्थ्यांची चिखलातून वाट... येवल्यातील गोल्हेवाडी - सायगाव रस्त्याची दुरवस्था - Villagers warned for agitation
येवला तालुक्यातील गोल्हेवाडी - सायगाव रस्ता तसेच त्या लगत असलेला जो शिवरस्ता आहे अशा दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था ( Bad Condition Of Roads ) झाली आहे. 30 ते 40 शालेय विद्यार्थी चिखल तुडवत शाळेत पोहोचत आहेत.रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत. रस्ता दुरुस्त न झाला तीव्र आंदोलन इशारा नागरिकांना दिला ( Villagers warned for agitation ) आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी -येवला तालुक्यातील ( Yewla taluka ) गोल्हेवाडी ते सायगाव हा रस्ता दुरुस्तीची 2011 सालापासून मागणी करून देखील सुद्धा येथील रस्ता होत नसल्याने पावसाळ्यामध्ये या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था होत असून पावसाचे पाणी साचल्याने मोठा चिखल व पाणी तुंबल्याने या गोल्हेवाडी गावातील विद्यार्थ्यांना या चिखलातून तसेच पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची वेळ येत आहे तर येथील नागरिकांना देखील मोठी कसरत करत ये - जा करावी लागत आहे. तसेच गोल्हेवाडी कडे येणारा शिवरस्ता आहे याची देखील मोठी दयनीय अवस्था झाली असून येथील विद्यार्थ्यांना गावात शाळेत येण्यासाठी नेहमीच आपल्या आई-वडिलांनासोबत घेऊन येण्याची वेळ येत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी बाळंतीण असलेल्या महिलेला अक्षरशः ट्रॅक्टरमध्ये टाकून नेण्याची वेळ आली ( pregnent woman taken from tractor )होती. तरी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत असून रस्ता दुरुस्त न झाला तीव्र आंदोलन इशारा नागरिकांना दिला ( Villagers warned for agitation ) आहे.