महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरीच्या मदरशात अडकलेले विद्यार्थी अखेर बिहारला रवाना - नाशिक कोरोना बातमी

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील वणी येथे बिहार राज्यातील ११ विद्यार्थी अडकले होते. सोमवारी हे विद्यार्थी नाशिक रेल्वे स्थानकावरून बिहारसाठी रवाना झाले.

nashik corona news
Students stranded at Dindori madrassa due to lockdown sent to Bihar

By

Published : Jun 1, 2020, 7:29 PM IST

नाशिक -कोरोनाच्या पार्शश्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील वणी येथील मदरशामध्ये बिहार राज्यातील ११ विद्यार्थी अडकून पडले होते. हे सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी याठिकाणी राहत होते. सोमवारी हे विद्यार्थी नाशिक रेल्वे स्थानकावरून बिहारला रवाना झाले.

मागील आठवडयामध्ये प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील मजूरांना विशेष रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले होते. परंतू बिहारा राज्यातील पटनासाठी रेल्वे नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील वणीमधील २२ तसेच पांडाणे येथील ९ अशा ३१ विद्यार्थी आणि मजुरांची दिंडोरी महसूल विभागामार्फत एसटीने नाशिक रेल्वे स्टेशनपर्यंत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. नाशिक रोड येथून पटनासाठी रेल्वे जाणार असल्याचे सांगितल्यानंतर परराज्यातील विद्यार्थी व मजुरांची वणी ग्रांमपंचायत आणि महसूल विभागामार्फत व्यवस्था करण्यात आल्याचे महसूल अधिकारी एल. जी पवार यांनी सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details