नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात तब्बल दोन वर्षानंतर पाहिलेपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, प्रदीर्घ कालखंडानंतर विद्यार्थी पुन्हा शाळेत येणार असल्याने सुरवातीला शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधावा, पहिला महिनाभर वेगवेगळ्या माध्यमातून मुलांचे समुपदेशन व्हावे आणि या नंतर विद्यार्थ्यांना शाळेची सवय झाल्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनाला सुरवात करावी असं मत शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी 'ईटीव्ही भारता'शी बोलताना म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतर राज्य सरकार कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथिल करत आहे. पहिल्या टप्प्यात शहरांमधील आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्यानंतर आता येत्या एक डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शहरी भागात पहिली ते सातवी पर्यंतचे तर ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक आदींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घ्यावी -