नाशिक - शहरातील के के वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली आहे. सध्या सर्वत्र ही कार आणि कार तयार करणारे हे 'रँचो विद्यार्थी' चर्चेचा विषय ठरत आहेत.
नाशिकच्या 'रँचों'ची कमाल, टाकाऊ वस्तूंपासून बनवली इलेक्ट्रिक कार
वापरात नसलेल्या वस्तूंचा उपयोग करून के के वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'इलेक्ट्रिक कार' साकारली आहे. बारा विद्यार्थ्यांनी एकत्र येत टाकाऊ वस्तूंपासून ही कार तयार केली आहे.
वापरात नसलेल्या वस्तूंचा उपयोग करून के के वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक कार बनवली आहे. बारा विद्यार्थ्यांनी एकत्र येत टाकाऊ वस्तूंपासून ही कार साकारली आहे. या कारमध्ये 1 कीवॅट डीसी मोटर, 48 वोल्ट 30 अँपियर बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या कारचे वजन 160 किलो असून, एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ही कार 70 किलोमीटर पर्यंत धावू शकते. तसेच या कारमध्ये 12 ते 13 लोकं बसण्याची क्षमता आहे. तर, अशी ही आगळीवेगळी कार सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून, विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या हुशारीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये मुसळधार.. 17 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू