महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये महाविद्यालयीन फी वाढी विरोधात छात्र भारतीचे ठिय्या आंदोलन - एलयूएच

बारावीपर्यंत मोफत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी, घेतलेली अतिरिक्त फी परत मिळावी, अशा छात्रभारतीच्या मागण्या आहेत.

फी वाढ विरोधात छात्र भारतीने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातच ठिय्या मांडत आंदोलन केले.

By

Published : Jul 5, 2019, 12:17 PM IST

नाशिक - जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश सुरू झाले आहेत. मात्र, संस्थाचालक देणग्या, अतिरिक्त फीच्या नावाखाली पालकांना लुटत आहेत. त्यामुळे हे सर्व थांबाबे यासाठी छात्र भारतीने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातच ठिय्या मांडत आंदोलन केले.

महाविद्यालयीन फी वाढ विरोधात छात्र भारतीचे ठिय्या आंदोलन.

बारावीपर्यंत मोफत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी, घेतलेली अतिरिक्त फी परत मिळावी, अशा छात्रभारतीच्या मागण्या आहेत. यावेळी आंदोलकांनी जादा फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची यादी सादर केली. यामध्ये नाशिक शहरातील केटीएचएम कॉलेज, केव्हीएन कॉलेज, बीवायके कॉलेज, आरवायके कॉलेज, बिटको कॉलेज, पीव्हीजी कॉलेज, जीएमडी कॉलेज, केएसकेडब्ल्यू कॉलेज, एलयूएच कॉलेज यांचा समावेश आहे.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले की शाळा आणि महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांची धांदल उडते. मात्र, संस्थाचालकांसाठी ही पर्वणीच असते. देणग्या, अतिरिक्त फीच्या नावाखाली शाळा, महाविद्यालये पालकांकडून सर्रास वसुली करतात. या सक्तीच्या दंड वसुली विरोधात अनेक आंदोलने झाली. सरकारने ही संस्थाचालकांना ठणकावून सांगितले. मात्र, शैक्षणिक संस्थाचालकांची मुजोरी सुरूच आहे.

या आंदोलनात राकेश पवार, आम्रपाली वाकळे, निवृत्ती खेताडे, समाधान बागुल, राहुल सूर्यवंशी, भावेश सोनवणे, वनिता जावळे यांनी सहभाग घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details