महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Inspirational Story Of Jyoti Wagh : उकळत्या तेलात हाताने पाववडा तळणाऱ्या ज्योती वाघ यांची संघर्षमय कहाणी - उकळत्या तेलात हाताने पाववडा तळणाऱ्या

उकळत्या तेलात हाताने पाववडा तळणाऱ्या (fry pavvada by hand in boiling oil) ज्योती वाघ यांची संघर्षमय (Struggle story of Jyoti Wagh) कहाणी. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, असे हसत सांगणाऱ्या ज्योती वाघ यांनी ईटिव्ही सोबत केलेली बातचीत जाणुन घेऊया. Inspirational Story Of Jyoti Wagh

Inspirational Story Of Jyoti Wagh
ज्योती वाघ

By

Published : Nov 23, 2022, 7:31 PM IST

नाशिक :नाशिक मध्ये उकळत्या तेलात हाताने पाववडा तळणाऱ्या (fry pavvada by hand in boiling oil) ज्योती वाघ यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. मात्र या मागे ज्योती ताईंचे कष्ट (Struggle story of Jyoti Wagh) आहे. याबाबत ईटीव्ही भारतशी त्यांनी साधलेला संवाद. Inspirational Story Of Jyoti Wagh

प्रतिक्रिया देतांना ज्योती वाघ आणि ग्राहक



व्यवसाय करण्याचा निर्धार केला : ज्योती वाघ या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील जानोरी गावच्या रहिवाशी. काही वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर दोन लहान मुलांच्या शिक्षणाची आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. जेमतेम शिक्षण असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी मोजक्या पगारावर छोटी मोठी नोकरी केली आणि त्यातून त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत राहिल्या. अशात आई आजारी पडल्याने त्यांना दोन महिने घरी राहावे लागले. त्यामुळे नोकरी गेली पुन्हा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला. मात्र यावेळी नोकरी न करता स्वतः काहीतरी व्यवसाय सुरू करावा, म्हणून अफाट जिद्द आणि सामर्थ्यच्या जोरावर त्यांनी अशोक मार्ग परिसरात, विजय ममता टॉकीजच्या मागे नवदुर्गा फुड्स स्टॉल सुरू करत, नवीन व्यवसायाला सुरवात केली. सुरवातीला फार काही प्रतिसाद मिळत नव्हता. ग्राहक ही येत नव्हते. पण चांगल्या प्रकारचा पाववडा द्यायचा, साहित्य उत्तम वापरायचं असं त्यांनी ठरवल होतं. हळूहळू ग्राहकांची आपोआप संख्या वाढली.



म्हणून हाताने वडे काढायला सुरुवात झाली :मी छोटा व्यवसाय तर सुरू केला ,मात्र सर्व एकटीने करायचं म्हटल्यावर खूप धावपळ होत होती.मात्र मी जिद्द सोडली नाही,हे आपल्या करावेच लागेल तरच आपण आपल्या मुलांचा पालनपोषण करू शकतो या विचाराने मी जोमाने काम करायचे.गर्दी वाढल्यावर झाऱ्याने वडे काढण्यास जरा वेळ लागायचा.ग्राहक जास्त वेळ ताटकळत उभे राहायचे म्हणून चटका बसो की काही होवो मी पटकन हातानं वडे कढईतून काढून ग्राहकांना द्यायचे,असं ज्योती वाघ यांनी सांगितलं.



महिलांनी संघर्ष करावा :महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. मात्र कधी कधी जीवनात येणाऱ्या अडचणी मुळे महिला हतबल होतात. मात्र चांगले कर्म, आवडीचा व्यवसाय निवडला तर, यश नक्कीच मिळते. कुठलाही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो. फक्त त्यात कष्ट आणि सातत्य ठेवलं तर यश हमखास मिळते, असं ज्योती वाघ सांगतात.



त्याच्या कार्याला सलाम :ज्योती ताईकडे बघून खूप कौतुक वाटतं. आम्ही नेहमी या ठिकाणी पाववडा खाण्यासाठी येतो. त्या ज्या पद्धतीने उकळत्या कढईत वडे तळतात, त्याला आम्ही सलाम करतो. ताई ज्याप्रमाणे सर्व ग्राहकांशी छान संवाद ठेवता ते ही छान वाटतं. त्यांनी केलेले वडे अप्रतिम आहे, असं मतं ग्राहकांनी व्यक्त केलं. Inspirational Story Of Jyoti Wagh

ABOUT THE AUTHOR

...view details